Saturday, July 24, 2021
No menu items!
Homeकोरोनासोशल मीडियावरील फेक मॅसेजपासून सावध रहा जिल्हा माहिती अधिकार्‍यांचे आवाहन

सोशल मीडियावरील फेक मॅसेजपासून सावध रहा जिल्हा माहिती अधिकार्‍यांचे आवाहन


बीड (रिपोर्टर):- कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. लोकांना वेळोवेळी कोरोनाची अपडेट प्रशासनाकडून दिली जात आहे. मात्र काही जण सोशल मीडियावर प्रशासनाच्या नावाने फेक मॅसेज तयार करून लोकांची दिशाभूल करत आहेत. अशा लोकांवर जिल्हा प्रशासन योग्य ती कारवाई करेल, मात्र कोणताही मॅसेज फॉरवर्ड करण्यापुर्वी त्याची खात्री करावी, खोटे मॅसेज पसरवून लोकात भीती निर्माण करणे, कोरोनाची दुसरी लाट येणार आहे, बीड जिल्हा कलेक्टर ऑफीसकडून सूचना, असे फेक मॅसेज फॉरवर्ड करण्यात आले होते. त्यानंतर आज पदभरतीचा एक खोटा मॅसेज फॉरवर्ड करण्यात आला आहे. यामध्ये जिजाऊ कोविड सेंटर, जिजाऊ मॉ साहेब पब्लिक स्कूल, वासनवाडी फाटा बीड येथे नव्याने सुरू होत असलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये पदभरती होणार असल्याचे फेक मॅसेज सोशल मीडियावर फॉरवर्ड करून लोकांची दिशाभूल करण्यात आली आहे. मात्र प्रशासनाच्या वतीने अशी कुठलीही पदभरती काढण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी खात्री केल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये, कुठलेही फेक मॅसेज फॉरवर्ड करू नये, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी यांनी केले आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!