बीड (रिपोर्टर) ग्रामरोजगार सेवकासह इतर कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले होते. याची दखल महाराष्ट्र राज्याचे रोजगार मंत्री संदीपान भुमरे यांनी घेतली. संघटनेच्या पदाधिकार्यांना चर्चा करण्यासाठी बोलावून घेतले होते.या वेळी सकारात्मक चर्चा झाली. 20 किंवा 20 पेक्षा जास्त मजूर असले तरच एनएमएमएस अॅपद्वारे हजेरी घेण्यासाठी मस्टर रोलमध्ये एक मजूर ठेवण्यासंदर्भातले नवीन जीआर पास करून घेण्यास आदेश देणार असल्याचे मंत्र्यांनी संघटनेला म्हटले आहे. इतर मागण्यांसंदर्भातही लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.
मनरेगा अंतर्गत काही जाचक अटी लावण्यात आल्या होत्या. त्यामुळे ग्रामरोजगार सेवकात संताप व्यक्त केला जात होता. संघटनेने कामबंद आंदोलन केले होते. याची दखल रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी घेतली. संघटनेच्या पदाधिकार्यांसोबत काल चर्चा झाली. या चर्चेमध्ये अनेक आश्वासने मंत्री महोदयांनी संघटनेला दिले आहेत. सार्वजनिक कामावरती एक किंवा एकपेक्षा जास्त मजूर असल्यास एनएमएसद्वारे हजेरी घेण्याचे शासनाने जीआर काढला होता. परंतु बैठकीमध्ये 20 किंवा 20 पेक्षा जास्त मजूर असल्यासच एनएमएसएम अॅपद्वारे हजेरी घेण्यासाठी मस्टर रोलमध्ये एक मजूर ठेवण्याची तरतूद करण्यासंबंधीचे नवीन जीआर पास करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह इतर मागण्यांबाबतही चांगली चर्चा झाली. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास जोगदंडे, बाळासाहेब तायडे, राजेंद्र जिचकार, वासुदेव गोतमारे, श्रावण बोकडे, अंबादास वाहुरवार, दयानंद कांबळे, तुळशीदास बोकडे, नरेंद्र आरबट, नागपासे, रामगोपाळ ढोबळे, रमेश वसीने, खुशाल पाटील, डोंगरे, भजनदास, पाटोळे, तानाजी पाटील यांच्यासह आदींची उपस्थिती होती.