Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeकोरोनासणासुदीच्या काळात राशन दुकानदारांचा बंद कोरोना जाईपर्यंत बायोमॅट्रिक पद्धत बंद करा

सणासुदीच्या काळात राशन दुकानदारांचा बंद कोरोना जाईपर्यंत बायोमॅट्रिक पद्धत बंद करा


केज (रिपोर्टर):- कोरोनाचा संकटकाळ सुरू असताना राशन दुकानदारांनी एक मेपासून बंद पुकारला. या बंदमुळे सर्वसामान्य नागरिकांना राशन मिळेना. बायोमॅट्रिक पद्धत कोरोना जायेपर्यंत बंद करावी या मागणीसाठी संघटनेने बंदची हाक दिली आहे. अक्षयतृतिया आणि रमजान ईद येत्या काही दिवसांवर येत आहे आणि याच कार्यकाळात राशन दुकानदारांनी बंद पुकारल्याने सर्वसामान्य नागरिकांत संताप व्यक्त केला जात आहे. राशनचा काळाबाजार रोखण्यासाठी पुरवठा विभागाने बायोमॅट्रिक पद्धत सुरू केलेली आहे. गेल्या एक वर्षापासून देशात कोरोनाचा संसर्ग सुरू आहे. हा संसर्ग अद्यापही आटोक्यात आलेला नाही. मशिनला अंगठा लावल्यामुळे राशन दुकानदारही बाधित होऊ शकतात. त्यासाठी तात्पुरती बायोमॅट्रिक प्रणाली बंद करावी या मागणीसाठी १ मेपासून राशन दुकानदारांनी संप पुकारलेला आहे. या संपाचा फटका सर्वसामान्य कार्डधारकांना बसू लागला. अक्षयतृतिया आणि रमजान ईद तोंडावर आलेले असताना राशन दुकानदारांनी बंद पुकारल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची अडचण निर्माण झाली आहे. त्यांना राशन मिळत नसल्याचे दिसून येत आहे. याबाबत तात्काळ तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान जोपर्यंत शासन ठोस काही निर्णय घेत नाही तोपर्यंत बंद मागे घेण्यात येणार नसल्याचा इशारा तालुकाध्यक्ष विष्णू दांगट यांनी दिला आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!