बीड (रिपोर्टर) कोरोनाचा कार्यकाळ लॉकडाऊनमध्ये गेल्याने सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. याचा परिणाम शिक्षण व्यवस्थेवर जाणवला. अनेक विद्यार्थ्यांना साधी बेरीज येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मध्यंतरी झालेल्या सर्व्हेमध्ये बीड जिल्ह्यातल्या 50 टक्केच्या पुढील विद्यार्थी वाचन-लेखनमध्ये मागे आहेत.
कोरोनामध्ये सर्व शाळा बंद ठेवण्यात आलेल्या होत्या. ऑनलाईन शिक्षण पद्धत सुरू होती. ऑनलाईनमध्ये सर्वच विद्यार्थी सहभागी होत नव्हते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. कोरोनानंतर आता परिस्थिती बदललेली आहे. मात्र ज्या विद्यार्थी दोन वर्षे विविध वर्गात शिकत होते त्यातील अनेक विद्यार्थ्यांना साधी बेरीज-वजाबाकी येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रथम संस्थेमध्ये केलेल्या सर्व्हेमध्ये ही बाब समोर आलेली आहे. शिक्षण विभागाने मध्यंतरी सर्व्हे केला त्यातही अनेक विद्यार्थी कच्चे असल्याचे समोर आलेले आहे. बीड जिल्ह्याची संपादणूक स्थिती 50 टक्केच्या आत आहे. तिसरीच्या विद्यार्थ्यांची स्थिती 62.5, पाचवीच्या विद्यार्थ्यांची स्थिती 55.5 , आठवीच्या विद्यार्थ्यांची स्थिती 41.9 व दहावीच्या विद्यार्थ्यांची संपादणूक स्थिती 37.2 टक्के आलेली आहे. सदरील मुलांना योग्य पद्धतीने शिक्षण देण्याच्या सूचना शिक्षण विभागाने संबंधितांना दिल्या आहेत.