वाहनधारक आडवेतिडवे वाहने उभे करतात
बीड (रिपोर्टर) बीड शहरातील विविध रस्त्यांवर वाहनधारक आडवे तिडवे वाहने उभे करत असल्याने वाहतुकीची नेहमीच कोंडी होते. सुभाष रोड, भाजी मंडई यासह आदी रस्त्यांवर दिवसातून अनेक वेळा वाहतुक जाम होत असल्याचे दिसून येत आहे. आडवे-तिडवे वाहने लावणार्या वाहनधारकांवर पोलीस प्रशासनाने दंड आकारणे गरजेचे आहे तसेच काही दुकानदार नालीच्या अलीकडे आल्यामुळे त्याचाही परिणाम वाहतुकीवर होऊ लागला आहे.
शहरातील सुभाष रोड, भाजी मंडई, कारंजा, टिळक रोड यासह आदी भागांमध्ये वाहतुकीबाबत तक्रारी असतात. काही वाहनधारक दुकानासमोरच आडवेतिडवे वाहने उभे करत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. काही दुकानदारांनी हद्द सोडून रस्त्याच्या कडेला दुकानाच्या पाटया व इतर साहित्य लावलेले आहे. त्याचा देखील अडथळा निर्माण होऊ लागलाय. सुभाष रोड आणि भाजी मंडईत तर रोजच वाहतूक जाम होत असते. आडवे-तिडवे वाहने उभे करणार्या वाहनधारकांना पोलिसांनी दंड आकारणे गरजेचे आहे. नगरपालिका प्रशासनाने वाहतुकीकडे लक्ष द्यायला हवे.