बीड (रिपोर्टर) राज्यातले शिंदे सरकार आम्हीच शेतकर्याचे कैवारी म्हणून किती हि ओरडून सांगतात असले तरी बीड जिल्हात मात्र शेतकर्याचे या ना त्या कारणावरून हेळसांड पहाताना दिसून येत आहे . बजाज अलियान्झ कंपनीने चुकून अतिरिक्त 12 कोटी 35 लाख 13 हजार 358 रुपयांची रक्कम 12 हजार 883 शेतकर्यांच्या बँक खात्यांवर जमा केल्याचा दावा केला आहे. पैसे जमा झालेल्या खासगी, सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधील शेतकर्यांची बँक खाती कंपनीच्या सूचनेनुसार गेल्या महिनाभरापासून गोठवण्यात आली आहेत. त्या मुळे शेतकर्यांना स्वताहाचे पैसे देखील काढता येत नाहीत . या गंभीर प्रकरणाकडे ना शासन ना प्रशासन लक्ष देत नाही
या बाबत अधिक असे कि राज्यात आर्थिक फसणुकीच्या प्रकारात वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यात आता बीड जिल्ह्यातही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बीड जिल्ह्यात बजाज विमा कंपनी शेतकर्यांच्या मुळावर उठल्याचं पाहायला मिळते आहे. कंपनीची चूक असताना याचा नाहक त्रास शेतकर्यांना दिला जात असल्याचे समोर आले आहे. शेतकर्यांच्या खात्यावर साडेबारा कोटी रुपये जमा झाल्यानंतर कंपनीने जवळपास 12 हजारपेक्षा अधिक शेतकर्यांची खाती गोठवली आहेत. जवळपास गेल्या 1 महिन्यांपासून अनेक शेतकर्यांचे खाते गोठवले गेले आहेत. त्यामुळे या शेतकर्यांना ऐन कामाच्या वेळेला आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागत आहे.बजाज अलियान्झ कंपनीने चुकून अतिरिक्त 12 कोटी 35 लाख 13 हजार 358 रुपयांची रक्कम 12 हजार 883 शेतकर्यांच्या बँक खात्यांवर जमा केल्याचा दावा केला आहे. पैसे जमा झालेल्या खासगी, सहकारी आणि राष्ट्रीयीकृत बँकांमधील शेतकर्यांची बँक खाती कंपनीच्या सूचनेनुसार गेल्या महिनाभरापासून गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून शेतकर्यांचे आर्थिक व्यवहार ठप्प आहेत, असा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, ही कंपनीची चूक असताना त्याचा त्रास मात्र शेतकर्यांना सहन करावा लागत आहे.अनेक शेतकर्याना खाती गोठल्या मुळे स्वतःच्या हक्काचे पैसे हि काढता येत नाहीत.