Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeक्राईममुलाला वाचवण्यासाठी आईची पाण्यात उडी माय-लेकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

मुलाला वाचवण्यासाठी आईची पाण्यात उडी माय-लेकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू


मातृ दिनाच्या दिवशी गोदावरी नदीपात्रात घडलेली घटना

गेवराई (रिपोर्टर):- गोदावरी नदी पात्रावर धुणे धुत असतांना पाच वर्षीय मुलगा बुडत असल्याचे आईच्या निदर्शनास आल्यानंतर आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने पाण्यात उडी घेतली. यावेळी दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. आज मातृ दिन आहे या दिनच ही दु:खद घटना घडल्याने संगमजळगाव या गावावर शोककळा पसरली. घटनेची माहिती नागरीकांना होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलीसांना पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवून दिले होते.

34


संगमजळगाव येथील पल्लवी गोकुळ ढाकणे (वय २६) ही महिला धुणेधुण्यासाठी गोदावरी नदीपात्रात गेली होती. सदरील महिलेने आपला पाच वर्षीय मुलगा समर्थ गोकुळ ढाकणे यालाही सोबत नेले होते. धुणे धुत असतांना संगम हा पाण्यात गेला आणि तो बुडू लागला. मुलगा बुडत असल्याने आई पल्लवी हीच्या निदर्शनास आल्यानंतर पाण्यात उडी घेवून मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र पल्लवीला पोहता येत नसल्याने दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. आज मातृ दिन आहे, एका आईने आपल्याला मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र दोघांचाही दुर्दैवी अंत झाल्याने गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती संगमजळगाव येथील नागरीकांना झाल्यानंतर अनेकांनी त्या ठिकाणी धाव घेतली होती. गेवराई पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठवून देण्यात आले होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!