मुंबई (रिपोर्टर) गेली अनेक महिने राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे शिवप्रेमी आणि विरोधकांकडून त्यांचा निषेध वक्त करण्यात येत होता. भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन मुक्त करा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, केंद्र सरकारच्या वतीने तसा कोणतच निर्णय घेण्यात आला नाही. कार्यकाळा पूर्ण झाल्यानंतर देशातील 13 राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आले आहेत. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि लडाखचे लेफ्टनंट राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांनी राजीनामा दिला असून त्यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे.
भगतसिंह कोश्यारी हे गेल्या अनेक महिण्यांपासून त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यांची वक्तव्ये वादळी ठरली. त्यामुळे काळी काळ भाजपची डोकेदुखी वाढली होती. आतापर्यंत भगतसिंह कोश्यारी यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य पाहूयात…
औरंगाबादमध्ये 27 फेब्रुवारी रोजी भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणाक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल? मी शिवाजी किंवा चंद्रगुप्त यांना लहान दाखवत नाही. प्रत्येकाच्या मागे आईचे मोठे योगदान असते, तसेच आपल्या समाजात गुरूचे मोठे स्थान असते. शिवाजी महाराजांनी समर्थांना म्हटले की तुमच्या कृपेने मला राज्य मिळाले आहे. आता या देशाची परंपरा आहे, गुरू आहे तर त्याला गुरुदक्षिणा द्यावी लागते. त्यामुळे मी जिंकलोय, राज्याची स्थापना देखील झाली आणि मी रायगडावर आलो आहे. आता गुरुदक्षिणा म्हणून या राज्याची चावी तुम्हाला देतो, असे शिवाजी महाराज समर्थांना म्हटले, पण समर्थांनी ती चावी घेतली नाही. समर्थांनी शिवाजी महाराजांना ते या राज्याचे विश्वस्त असल्याचे सांगितले. हा भाव अशा सदगुरूकडे मिळतो, असे भगतसिंह कोश्यारी म्हटले होते त्यांच्या वक्तव्यानंतर मोठया प्रमाणात त्यांच्या विरोध झाल्याने त्यावर राज्यपाल कोश्यारी यांनी सारवासारव केली होती.
राज्यातील खरे हीरो आता शिवाजी नसून नितीन गडकरी आणि शरद पवार आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या झालेल्या 62 व्या दीक्षांत सोहळ्यात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे (पान 7 वर)
अध्यक्ष शरद पवार यांना त्यांच्या हस्ते डी.लिट. ही मानद पदवी देऊन गौरवले. त्या वेळी दोन्ही नेत्यांची स्तुती करताना पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत गडकरी, पवारांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केली. ते म्हणाले, शिवाजी आता जुन्या युगातील आहेत. या राज्यातील खरे हीरो आता शिवाजी नसून नितीन गडकरी आणि शरद पवार आहेत, असे वक्तव्य केल्याने त्यांच्याविरोधात विरोधकि आक्रमक झाले. यानंतरही त्यांच्या वक्तव्याचा चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचे म्हणताच मविआने राज्यपालांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. पुण्यात 14 फेब्रुवारी रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुतळा अनावरण समारंभात भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप केला जातोय. यावेळीच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, कल्पना करा की सावित्री बाईंचे लग्न 10 वर्षी झाले, तेव्हा त्यांच्या पतीचे वय हे 13 वर्ष होते. कल्पना करा की लडके-लडकीया, मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील यावेळी दोन्ही गोष्टी बोलताना राज्यपाल मध्येच हसले होते.
एक प्रकारे तो कालखंड मुर्तीच्या पुढे फुले वाहण्याच्या, नतमस्तक होण्याइतकाच नव्हे, तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकण्याचीही संधी आहे, असे वक्तव्य राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले होते.
कारगिल विजय दिनाच्या 22 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते कारगिल योद्ध्यांचा तसेच हुतात्मा जवानांच्या कुटुंबियांचा राजभवन येथे सत्कार करण्यात आला. यावेळी हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे यांच्या वीरमाता अनुराधा गोरे लिखित अशक्य ते शक्य कारगिल संघर्ष या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हजर होते.