करून गुन्हे दाखल करावेत अशी ग्रामस्थांची मागणी
नेकनुर(रिपोर्टर): बीड तालुक्यातील नेकनूर येथील सर्वात मोठी म्हणून ओळखली जाणारी ग्रामपंचायत म्हणून नेकनूर ओळख आहे या ग्रामपंचायत च्या भ्रष्टाचार चव्हाट्यावर आहे . 2018 ते 2022 मध्ये 14 वा व 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आलेली रक्कमचा भ्रष्टाचार, अपहार ग्रामपंचायत चे सरपंच व ग्रामसेवक बहिरवाळ यांनी केले आहे.मा जिल्हाधिकारी यांनी नेकनूर ग्रामपंचायत कडे लक्ष देऊन संबंधित सरपंच व ग्रामसेवक बहिरवाळ यांची चौकशी करून लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी नेकनूर ग्रामस्थांकडून होत आहे .
शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी शासनाकडून ग्रामपंचायतला आलेला निधी 31 लाख 35 हजार रुपये हे जिल्हा परिषद शाळेला साहित्य खरेदी करण्यासाठी आले होते. मग नेकनूर चे विद्यमान सरपंच आणि आदर्श ग्रामसेवक यांनी एक रुपयाची सुद्धा वस्तू न आणता बिल उचलून अपहार केलेला आहे.
गावात नाल्या आणि रस्त्यांसाठी आलेले लाख रुपये ग्रामपंचायतने काम न करता उचले असुन गावातील समाज मंदिर बांधकाम दुरुस्तीसाठी 14 व 15 व्या वित्त आयोगामधून बारा लाख 35 हजार रुपयाची उचल केलेली दिसून आलेली आहे सदरील गैरव्यवहार हा इतक्या मोठ्या प्रमाणात झाला आहे की त्याच्या चौकशी शिवाय गत्यंतर नाही तसेच 2022-23 या वित्त वर्षांमध्ये नेकनूर मध्ये 1. आपले सरकार सेवा केंद्र व प्रशासकीय खर्च साठी 10 लाख 73 हजार पाचशे सत्तावीस रुपये खर्च करण्यात आले? 2.ओला व सुका कचरा साठी पॉलिथिन बॅग दीड लाख रुपये खर्च केल्याचा दाखवण्यात आलेला आहे. 3.प्लास्टिक कचरा कुंड्या खरेदीसाठी तीन लाख रुपये? 4. दलित वस्तीवर पिण्याच्या पाण्याच्या टाकी साठी पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले? 5.फिल्टर दुरुस्तीसाठी पाच लाख रुपये मंजूर करण्यात आले? 6.सिमेंट बाकडे खरेदीसाठी दोन लाख रुपये खच र् करण्यात? 7. फवारणीसाठी दोन लाख रुपये खर्च करण्यात आले, 8.ब्लिचिंग पावडर साठी दीड लाख रुपये खर्च करण्यात आले आले? 9.ओपन जिम साठी पाच लाख रुपये मंजूर झालेले आहेत? 10. बाल उद्यान साठी दोन लाख रुपये मंजूर झालेले आहे? 11.ग्रामपंचायत वाहन खरेदीसाठी सात लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे? 12. सय्यद नगर मध्ये रोड व नाली साठी दोन लाख रुपये खर्च करण्यात आले? 13.इस्लामपुरामध्ये सिमेंट रोड आणि नालीचे बांधकामासाठी सात लाख पन्नास हजार रुपये खर्च केला आहे? 14.अपंगासाठी आवश्यक साहित्य दोन लाख रुपये मंजूर करण्यात आले? आणि ग्रामपंचायत च्या हद्दीतील या सर्व बाबी आहेत. 15. जिल्हा परिषदच्या एकुण 13 शाळेला डिजिटल करणे व आवश्यक साहित्य खरेदीसाठी 70 हजार रुपये प्रत्येक शाळेला मंजूर करण्यात आले? हे विकास काम आपल्या ग्रामपंचायतीने केलेला आहे ते आपल्याला नेकनूरमध्ये दिसत आहे का? तसेच आपण प्रत्येक वर्षीचा अहवाल ग्रामस्वराज प याच्या माध्यमातून बघू शकतात. शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी 21 लाख 25 हजार रुपये रक्कम खरेदी ना करतात अपहर केला . रस्ते नाल्यासाठी आलेले एक लाख 37 हजार रुपये रस्ते ना बनवितात उचलले. समाज मंदिर बांधकाम दुरुस्तीसाठी 14 व्या व 15 व्या वित्त आयोग मधून आलेले बारा लाख 35 हजार रुपये चा काम ना करता अपहार केला. व उचलून खाल्ल्याचे दिसून येत आहे. नेकनूर सावंतवाडी वैतागवाडी या गावांमध्ये एलईडी लाईट बसवण्यासाठी 86 लाख रुपये आले होते एलईडी एक सुद्धा बसवण्यात आलेली नाही 86 लाख उचले असून एक रुपयाही त्या गावासाठी खर्च केलेला प्रत्यक्षात दिसून येत नाही. अंगणवाडी सेविकांचे साहित्य खरेदी करण्यासाठी 22 लाख 60 हजार रुपये आले होते एक सुद्धा साहित्य खरेदी केली नाही फक्त कागदावर दाखवून 22 लाख 60 हजार रुपये पूर्णच्या पूर्ण गिळंकृत करण्यात आलेले आहे याचा देखील अपहार केला. ग्रामपंचायत नेकनूर 2018 ते 2022 मध्ये घण कचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायत सक्षम असताना सुद्धा ग्रामपंचायत ने ठेकेदाराला काम देऊन या कामांमध्ये रक्कम 95 लाख रुपये खर्च करून अतिशय दर्जेहिन प्रकारचे काम करून अपहार केला. या सर्व कामाची रीतसर चौकशी करून यावर एक कमिटी नेमून, झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून भ्रष्टाचार करणार्या संबंधित सरपंच व ग्रामसेवकावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे तसेच अशा प्रकारचे निवेदन देखील जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे देण्यात आलेले आहे जर कारवाई नाही झाली किंवा चौकशी नाही झाली तर ग्रामस्थांनी कठोर निर्णय घेण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे.