Sunday, August 1, 2021
No menu items!
Homeक्राईमविवाहित महिलेवर अत्याचार आरोपी विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विवाहित महिलेवर अत्याचार आरोपी विरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

शिरूर कासार (रिपोर्टर):- बीडहून आपल्या गावी निघालेल्या एका २२ वर्षीय विवाहितेला आपल्या गाडीवर जबरदस्तीने बसवून एका पुलाखाली नेवून तिच्या अत्याचार केल्याचा प्रकार १६ मे रोजी शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडला. या प्रकरणी आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात कलम ३७६, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.


शिरूर तालुक्यातील पांगरी येथील २२ वर्षीय महिलेची छेडछाड नागेश छगन वारे हा करत असे. त्या छेडछाडीबाबत सदरील महिला १६ मे रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती. बीडहून परत जात असतांना महिला शिरूर कासार येथे थांबली होती. तितक्यात नागेश छगन वारे व अन्य एक जण मोटरसायकलवर आले. या दोघांनी महिलेला गाडीवर जबरदस्तीने बसवून तेथील पंपाच्या पुढे असलेल्या पुलाखाली नेवून जबरदस्ती केली. पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पिडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी नागेश छगन वारे याच्या विरूद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!