बीड (रिपोर्टर) :- ‘आम्ही पोलिस आहोत’, ‘वाहन कडेला घे’, ‘अवैध वाहतूक करतोस’ असे म्हणत तोतया पोलिसांकडून मादळमोही- पाथर्डी रोडवरील तिंतरवणी शिवारात अनेकांकडून वसूली केली जात आहे. या प्रकरणी चकलांबा पोलिस ठाण्यात एका उसाच्या ट्रॅक्टरचालकाने तक्रार दिली असून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आम्ही पोलिस आहोत असे म्हणून अनेकांना गंडविल्याच्या घटना उघडकीस येत आहेत. मादळमोही- पाथर्डी रोडवरील तिंतरवणी शिवारातील पेट्रोलपंपाजवळ अनेक वाहने अडवून आम्ही पोलिस आहोत. असे म्हणून वाहन चालकांकडून वसूली केली जात आहे. या प्रकरणी किरण श्रीकांत उगले (वय 24 वर्षे, व्यवसाय ट्रॅक्टरचालक) यांना 24 फेब्रुवारी रोजी अर्जुन प्पासाहे मिसाळ रा. तरटगव्हाण ता. शिरुर कासार याने दुचाकीवर येवून ट्रॅक्टरला दुचाकी अडवी लावली व आम्ही चकलंबा पोलिस ठाण्यातून आलो आहोत. असे म्हणत त्याला पैशाची मागणी केली. चालकाने पैसे देण्यास नकार देताच त्याचा बळजबरीने मोबाई व खिशातील पाचशे रुपये काढून घेत त्याला मारहान करुन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्डयात टाकून दिले. अशी फिर्याद किरण उगले यांनी चकलंबा पोलिस ठाण्यात दिल्याने अर्जुन मिसाळ याच्या विरुध्द कलम 392,170,34 भादवी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि इंगळे हे करत आहेत.