वडवणी येथील घटना
बीड (रिपोर्टर) पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप, विंचू बिळातून बाहेर निघून मानवी वसाहतींमध्ये शिरत असतात. दरवर्षी अनेकांचा सर्पदंशाने मृत्यू होतो. वडवणी येथील झोपेत असताना दोन चिमुकल्यांना सापाने चावा घेतला. यात एकाचा मृत्यू झाला तर दुसर्याची मृत्यूशी झूंज सुरू आहे.
वडवणी शहरातील कैकाडी गल्ली येथील सागर ऊर्फ आदर्श बाळू गायकवाड (वय साडेचार वर्षे) आणि आर्यन गायकवाड (वय 6 वर्षे) या दोन बालकांना मध्यरात्रीच्या दरम्यान साप चावला. पोटात दुखतय म्हणून मुलाने आईकडे तक्रार केली असता आईला अंथरुणामध्ये साप निदर्शनास आला. या वेळी सापाला मारण्यात आले, दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र सागर ऊर्फ आदर्श बाळू गायकवाड या साडेचार वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून आर्यन गायकवाड याच्यावर धारूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने वडवणी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.