बीड (रिपोर्टर): छत्रपती संभाजीनगरच्या व्यापार्याला अंबाजोगाईत लिफ्ट देण्याचा बहाना करुन लुटल्याची घटना 14 फेब्रुवारी रोजी घडली होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला असून परभणी येथून भगतसिंग दुल्लत यांनी मोठ्या शिताफीने मुख्य सुत्रधाराच्या मुसक्या बांधल्या त्यांनंतर त्याच्या दोन्ही साथीदारालाही पकडले.
नरेश शामराव रामकर (वय 33 वर्षे रा. संजयनगर, छत्रपती संभाजीनगर) हे अंबाजोगाई येथे मार्केटींगचे काम करुन 14 फेबु्रवारी रोजी दुपारी 4.30 वाजता औरंगाबाद कडे जाण्यासाठी लातूर टी-पॉईट येथे बसची वाट पाहत असतांना एका पांढर्या रंगाची डस्टर कारला हात केला असता त्यांनी रामकर यांना लिप्ट दिल्यानंतर गाडी अंबाजोगाई शहराच्या बाहेर जाताच चाकुचा धाक दाखवून खिशातील रोख रक्कम व एटीएम मधील पैसे असा 60 हजाराचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतले. अशी फिर्यादी रामकर यांनी दिली होती. त्यावरुन अंबाजोगाई शहर येथे गु.र.नं. 63/2023 कलम 392 506, 34 भा. दं. वि. प्रमाणे दाखल झाला होता. सदरची बाब गंभीरतेने घेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय सतिष वाघ यांनी तपासाचे चक्रे फिरवली. दि.15 मार्च रोजी त्यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा प्रितम विश्वनाथ खंदारे रा. परभणी याने त्याचे दोन साथीदारासह केलेला असून तो सध्या परभणी येथे आहे. त्यावरुन पो.उप.नि. भगतसिंग दुलत व त्यांच्या टिमने आरोपीचा परभणी येथे शोध घेवून त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याने पोलिसांना गुन्हा केल्याची कबुली दिली. सोबतचे साथीदार हे अंबाजोगाई येथे असल्याचे सांगितले. त्यानंतर अदित्य अशोकराव देशमुख (वय 21 वर्ष रा. खडकपुरा, अंबाजोगाई) अक्षय ऊर्फ राया सुधाकर धारेकर वय 24 वर्ष रा. मुळेगांव ता. केज) या आरोपींना ताब्यात घेवून पुढील तपासकामी पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर यांचे ताब्यात दिले. सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, उप्पर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे भगतसिंग दुल्लत यंाच्यासह अंमलदार यांनी केलेली आहे.