बीड(रिपोर्टर): बेलगुडवाडी येथील नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करतांना एक ट्रॉक्टर पोलिसांनी पकडला मात्र ट्रॅली सोडून चालक हेड घेवून पळून गेला. या प्रकरणी तलवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. की घटना 14 मार्च रोजी घडली. बेलगुडवाडीपासून काही अंतरावर वाळू उपसा होत असल्याची माहिती तलवाडा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी नदी पात्रात धाड टाकली असता एक ट्रॅक्टर वाळू घेवून जात होता. पोलिसांना पाहताच ट्रॅक्टर चालकाने वाळूने भरलेली ट्रॅली तेथेच सोडून हेड घेवून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅली मालकाचा शोध घेवून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.