बीड (रिपोर्टर)ः-भारतीय लोकशाहीत प्रत्येकाला आपले
म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. तो राजा असो की रंक, श्रीमंत असो या गरीब, भारतीय घटनेने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. मात्र शासन प्रशासन व्यवस्थेत काम करतांना सर्वसामान्य जनांची सेवा हे प्रमुख उदिष्ट असते मात्र राज्यभरातील कर्मचार्यांनी हेच उदिष्ट बाजूला ठेवले. संपाचा अधिकार म्हणजे जनतेची सौराचार असे गृहीत धरुन गेल्या तिन दिवसापासून संपकरी कर्मचार्यांनी सर्वसामान्यातील सर्वसामान्यांना वेठीस धरले. सरकारचा आणि तुमचा झगडा आहे. त्यात सर्वसामान्यांना का वेठीस धरता? काळ्या फिती लावून काम करा, मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांना आडवा, संघटनेच्यावतीने सरकारसोबत चर्चा सुरू ठेवा. ते वर्तन उपस्थित कर्मचार्यांसाठी अधिक चांगले असेल. मात्र इथे सर्व सामान्यांना वेठीस धरणे म्हणजेच संपाचे पित्र स्वर्गात जाणे असे धोरण संपकरी कर्मचार्यांनी आखले.
जुन्या पेन्शन पध्दती लागू करण्यात याव्यात. या प्रमुख मागणीसाठी कर्मचार्यानी आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था पुर्णतः कोलमडून गेली आहे. विद्यार्थ्यांच्या परिक्षा आहे. तिथे अडचणी निर्माण झाल्या आहे. अन्य कार्यालयातील कामकाज पुर्णःता ठप्प झाले आहे. आरोग्य महसुल सह अन्य विभागातल्या कर्मचार्यांना पुकारलेल्या या संपामुळे सर्वसामान्यांतील सर्वसामान्य माणसांचे कामे अडकून पडले आहे. कर्मचार्यांची मागणी ही त्यांच्या दृष्टीने न्यायाीक असेल तर ती मागणी मान्य करण्यासाठी न्यायालयात जावे, सरकार विरोधात लोकांना अडचण होणार नाही अशा पध्दतीने आंदोलन करावे, काळ्या फिती लावून अथवा अन्य मार्गाने आंदोलन कसे करता येईल हे पहावे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, अथवा याबाबत नियुक्त केलेल्या समितीसोबत भांडावे. तिथे या आंदोलनाची तिव्रता अधिक दिसून येईल. हे आंदोलन करतांना सर्वसामान्यांची कामे अडली जाणार नाही. याकडे संपकर्यांनी अधिक लक्ष दिले असते तर आज संपाला सर्वसामान्यांतून विरोध झाला नसता. मात्र संपकरांनी गलेलठ्ठ पगार असतांना जुन्या पेन्शन योजनेसाठी सर्वसामान्यांना वेठीस धरले यातून संपकर्या विरोधात राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.