बीड (रिपोर्टर) शहरातील बाबा चौक भागामधील एका हॉटेल चालकाने 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केला. सदरील बाब समोर आल्यानंतर या चालकाला नागरिकांनी चांगलाच चोप दिला.
शेख युनुस याचे बाबा चौकात हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये एक 13 वर्षीय मुलगी दूध आणण्यासाठी गेली होती. या वेळी हॉटेल चालकाने मुलीचा विनयभंग केला. हा प्रकार येथील काही नागरिकांना समजल्यानंतर लोकांनी त्याला चांगलेच धूतले. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये त्याच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.