Friday, October 22, 2021
No menu items!
Homeबीडबीडचा पीक विमा पॅटर्न राज्यात राबवा

बीडचा पीक विमा पॅटर्न राज्यात राबवा


पंतप्रधानांच्या बैठकीत महाराष्ट्राची मागणी; धनंजय मुंडेंनी राबवला आहे पॅटर्न
बीड (रिपोर्टर):- कंपनी तोट्यात जात असल्याची ओरड करत गतवर्षी बीड जिल्ह्यातल्या शेतकर्‍यांचा विमा घेण्यास कुठलीही कंपनी तयार नव्हती. तेंव्हा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करत केंद्राच्या भारतीय विमा कंपनीशी करार करत नवा पॅटर्न राबवला. हा पॅटर्न राज्यात केवळ बीड पुरताच होता. आज जेंव्हा राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले तेंव्हा वेगवेगळ्या विषयांपाठोपाठ बीड जिल्ह्यात पीक विमाबाबत जो पॅटर्न राबविण्यात आला आहे तो संपूर्ण राज्यभरात राबवण्यात यावा अशी मागणीही पंतप्रधानांकडे करण्यात आली. याबाबतची माहिती दिल्लीत महाराष्ट्र सदनात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.


बीड जिल्ह्यामध्ये पीक विमा घेण्यासाठी कुठलीही खासगी विमा कंपनी पुढे येत नव्हती. कंपन्या तोट्यात जात असल्याची ओरड पीक विमा कंपन्या करत होत्या. त्यामुळे बीड जिल्ह्यातला शेतकरी पीक विमा भरण्याबाबत उत्सुक असतांना कंपनी नसल्यामुळे पीक विमा भरण्यापासून वंचित राहणार होता. अशा वेळी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्यात पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे या गंभीर प्रश्नी पाठपुरावा करत केंद्र सरकारच्या पीक विमा कंपनीसोबत करार केला आणि बीड जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा विमा भरून घेतला. मात्र यावेळेस पीक विमा बाबत नवा पॅटर्न बीडमध्ये गेल्यावर्षीपासून राबविण्यात आला. तो पॅटर्न असा आहे, पीक विमा कंपनीस शेतकर्‍याने समजा 10 रूपये भरले आणि शेतकर्‍याला नुकसान भरपाई म्हणून 110 रूपये मिळणार असतील तर विमा कंपनी शंभर रूपये देईल व वरील 10 रूपये हे राज्य सरकार शेतकर्‍यांना देईल. याच धोरणामध्ये शेतकर्‍याने 10 रूपये भरले असतील आणि त्याचे नुकसान झाले नसेल, शेतकर्‍यांना नुकसान भरपाई दिली गेली नसेल व विमा कंपनी 10 रूपये नफ्यात राहत असेल तर करारानुसार या 10 रूपयांमध्ये 5 रूपये राज्य सरकारला देण्यात येणार अशा प्रकारचा पीक विम्याचा बाबतचा नवा पॅटर्न गेल्यावर्षीपासून राबविण्यात आला होता. सदरचा पॅटर्न हा महाराष्ट्रात केवळ बीड जिल्ह्यातच आहे. आता हा पॅटर्न अवघ्या महाराष्ट्रात लागु करावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ना.अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. आज महाराष्ट्राचं तीन सदस्यीय शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटलं. त्या भेटीमध्ये पीक विम्याबाबत चर्चा झाली तेंव्हा बीड जिल्ह्यात जो पीक विम्याबाबतचा पॅटर्न राबविण्यात येत आहे तो महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात राबविण्यात यावा अशी मागणी पंतप्रधांनाकडे केल्याची मागणी महाराष्ट्रात सदनात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. ना.धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून बीड जिल्ह्यात राबविण्यात आलेला पॅटर्न हा राज्यभरात राबवावा असा पॅटर्न असल्याने धनंजय मुंडे यांच्या कर्तृत्व कर्मावर पुन्हा एक यशाचा तुरा मानला जात आहे. 

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!