दोन दिवसात महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान
बीड (रिपोर्टर)ः- एस.टी. महामंडळाची दयनिय अवस्था दिवसेंदिवस पहावयात मिळत आहे. राज्य सरकार महामंडळाला तोटयातून बाहेर काढण्यापेक्षा आणखी खड्यात टाकण्याचा प्रयत्न करत आहे. वयोवृध्दांना प्रवासात सवलती असतांना आता महिलांना 50 टक्के प्रवासात सुट देण्यात आली. या निर्णयाची काही दिवसापूर्वी अमलबजावणी होत नाही तोच एस.टी.महामंडळाकडे डिझेलला पैसे नसल्याचे समोर आले. दोन दिवसापासून डिझेल अभावी जिल्ह्यातील अनेक बसेस उभे आहे. बीड आगाराच्या 80 बसेस उभे असल्याने महामंडळाचे दोन दिवसात लाखो रुपयाचे नुकसान झाले.
एस.टी. महामंडळ पुर्ण तोट्यात आहे. या महामंडळाला तोट्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत नसल्याचे दिसून येत आहे. वयोवृध्दांना प्रवासात सवलत आहे. आता महिलांना 50 टक्के सुट देण्यात आली. या निर्णयाची अमलबजावणी सुरू असतांनाच महामंडळाकडे डिझेलसाठी पैसे नसल्याचे दिसून येत आहे. डिझेल अभावी गेल्या (पान 7 वर)
दोन दिवसापासून गाड्या आगारामध्ये उभ्या आहेत. बीड आगाराच्या 80 पेक्षा जास्त गाड्या उभ्या आहे. गाड्या उभ्या असल्याने दोन दिवसात महामंडळाचे लाखो रुपये नुकसान झाले. डिझेलअभावी गाड्या उभ्या ठेवण्याची नामुश्की महामंडळावर आली आहे. राज्य सरकारने याबाबत कुठलीही ठोस भूमीका घेतली नसल्याने हे सरकार विकासाभिमूख असल्याचा डांगोरा नुकताच पिटला जात आहे.