समाज कल्याण विभागाकडे 198 प्रस्ताव आले, 24 लाभार्थ्यांची होणार निवड
बीड (रिपोर्टर)ः- अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंम सहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची साधने देण्यात येणार असल्याने त्यासाठी अर्ज मागवण्यात आले होते. जवळपास 198 अर्ज आले होते. छाननी अंती 98 प्रस्ताव राहीले. यातून 24 लाभार्थ्यांची निवड करायची आहे. या निवडीसाठी 29 मार्च रोजी लकी ड्रॉ काढण्यात येणार असून यावेळी सबंधीत बचत गटाने उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी शिंदे यांनी केले आहे.
बचत गटांची आर्थीक उन्नती व्हावी यासाठी बचत गटांना विविध उपकरणे उपलब्ध करुन दिली जातात. मिनी ट्रॅक्टरसाठी बचत गटांचे प्रस्ताव मागणवण्यात आले होते. जिल्ह्यातून 198 प्रस्ताव प्राप्त झाले होते. छाननी अंती 98 प्रस्ताव राहीले. यातून आता 24 लाभार्थ्यांची निवड करायची आहे. या निवडीसाठी 29/03/2023 रोजी सकाळी 11 वाजता सामाजिक न्याय भवन नगर रोड बीड याठिकाणी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. तरी यावेळी सबंधीत बचत गटाने उपस्थित राहण्याचे आवाहन सहाय्यक समाज कल्याण आयुक्त आर.एम.शिंदे यांनी केली आहे.