Saturday, October 23, 2021
No menu items!
Homeकोरोनाजिल्ह्यात बाधितांचा आकडा घटला, मृत्युचा टक्का वाढला सात दिवसात २८८ बाधितांचा मृत्यु

जिल्ह्यात बाधितांचा आकडा घटला, मृत्युचा टक्का वाढला सात दिवसात २८८ बाधितांचा मृत्यु

गेल्या चोवीस तासात १९ मृत्युची नोंद
बीड (रिपोर्टर):- गेल्या तीन आठवड्यापासून बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा नगन्य येत असल्याने लॉकडाऊनमध्ये सशर्त सूट देण्यात आली. बाधितांपेक्षा रुग्ण बरे होऊन घरी जाणार्‍यांची संख्याही मोठी असली तरी कोरोनामुळे मृत्युमुख पडलेल्या बाधितांचा टक्का या महिन्यात वाढत असून गेल्या सात दिवसात जिल्ह्यात तब्बल २८८ बाधितांचा मृत्यु झाला आहे तर काल आरोग्य विभागाने माध्यमाला दिलेल्या आकडेवारीत २४ तासात जुन्या अपडेटसह २९ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद केल्याने काल एकाच दिवशी १९ मृत्युची नोंद झाली आहे. सदरची बाब चिंताजनक आहे. गेल्या सात दिवसांच्या आकडेवारीनुसार सरासरी रोज ४१ जणांचा मृत्यु होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.


कोरोनाने हाहाकार उडवून सोडलेल्या बीड जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यापासून कोरोना आटोक्यात आला आहे. रोज शंभर ते दीडशे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. जो आकडा १५०० ते २००० च्या घरात होता तो शेकड्यावर येऊन ठेपल्याने एकीकडे समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी गंभीर बाधित रुग्ण उपचार घेताना मृत्युमुखी पडत असल्याचेही समोर येत आहे. ७ जून २०२१ रोजी जिल्ह्यात २०५८ मृत्युची नोंद होते ती नोंद १४ जून रोजी २३४६ वर जावून पोहचली. म्हणजे गेल्या सात दिवसांच्या कालखंडामध्ये तब्बल २८८ जणांचा कोरोनाने मृत्यु झाला. काल आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार २४ तासात जुन्या दहा अपडेटस् सह २९ मृत्युची नोंद करण्यात आली आहे म्हणजे गेल्या २४ तासात १९ मृत्युची नोंद आहे. सरासरीनुसार गेल्या सात दिवसात दिवसाला ४१ बाधित मृत्यूमुखी पडत आहेत. ही धक्कादायक बाब समोर आली असून बाधितांचा आकडा घटला तरी मृत्युचा टक्का मात्र बीडमध्ये वाढल्याचे दिसून येते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!