बालकल्याण समितीने शाळेसह शिक्षण विभागाला बजावली नोटीस
बीड (रिपोर्टर) शहरातील तुलसी विद्यालयाने आठवीच्या मुलीस परीक्षेला बसू देण्यास नकार दिला आहे. याबाबत मुलीने बालकल्याण समितीकडे धाव घेतल्यानंतर या समितीने शाळेच्या मुख्याध्यापकासह प्राथमिक शिक्षण विभागाला नोटीस बजावली आहे. शिक्षण विभागाने गटविकास अधिकार्यास पत्र पाठवून मुलीस परीक्षेला बसू देण्याच्याचे निर्देश दिले आहेत.
शहरातील तुलसी विद्यालयामध्ये आठवी वर्गात एक मुलगी शिक्षण घेत असे. ती गेली काही महिने शाळेमध्ये आली नव्हती. 3 एप्रिलपासून परीक्षा होत असल्याने या परीक्षेला मुलीस बसू देर्यास मुख्याध्यापकाने नकार दिला. या बाबत मुलीने बालकल्याण समितीकडे लेखी अर्ज दाखल केला. समितीने मुख्याध्यापक आणि प्राथमिक शिक्षण विभागाला नोटीस बजावली. शिक्षण विभागाने याची दखल घेतली. शिक्षण विभागाने तालुका गटविकास अधिकार्याला पत्र पाठवून सदरील मुलीस परीक्षेला बसू देण्याचे निर्देश दिले आहेत. हे पत्र शाळेला पाठवण्याचे आदेशही शिक्षण विभागाला दिले आहे.