सरकार गतीमान, दरवाढ वेगवान
शिंदे-फडणवीसांच्या राज्यात महागाईचा भडका
एक एप्रिलपासून अत्यावश्यक औषधे दहा टक्क्यांनी, वीज अडीच रुपयांनी तर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे 18 टक्क्याने महागणार
बीड (रिपोर्टर) राज्यातील सर्वसामान्य जनतेचे आम्हीच कैवारी असल्याचा डांगोरा पिटवणार्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात सर्वसामान्यांना प्रचंड महागाईला सामोरे जावे लागत असून 1 एप्रिलपासून आरोग्यासाठी अत्यावश्यक असलेल्या औषधाच्या किमतीमध्ये तब्बल दहा टक्क्यांनी वाढ केली जाणार असल्याचे सांगण्यात येत असतानाच वीज दरवाढही अडीच टक्क्याने वाढवली जाणार आहे. त्यापाठोपाठ आता मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे टोल दरात तब्बल 18 टक्क्यांनी वाढ केली जाणार असल्यामुळे अधिवेशनात वारेमाप घोषणा करणार्या शिंदे-फडणवीस सरकारने आता सर्वसामान्य माणसाच्या खिशावर दरोडे टाकण्यास सुरुवात केली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सर्वसाामन्यातून व्यक्त होत आहे.
राज्याची आर्थिक परिस्थिती खालावलेली, राज्यातील शेतकर्यांच्या शेतीमालाला भाव नाही, कापूस घरात पडून आहे, सोयाबीन बेभाव जात आहे, अवकाळी पावसाने फळबागा उद्ध्वस्त झाले आहेत. सर्वसामान्य माणसाच्या खिशात दमडी पहावयास मिळत नाही, आर्थिक चणचण सर्वत्र दिसून येत असताना राज्यातले शिंदे-फडणवीस सरकार आता वीज, औषधसह राज्यातील टोल 1 एप्रिलपासून भाववाढ करणार आहे. काल-परवा झालेल्या अधिवेशनामध्ये शिंदे-फडणवीस सरकारने लोकांना भुलण्या इरादे आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक घोषणांचा पाऊस पाडला. राज्याची आर्थिकस्थिती एकीकडे गंभीर असल्याचे सांगत दुसरीकडे सर्वसामान्यांच्या आपलेच सरकार लोकांचे हित पाहते, हे दाखवण्यासाठी अनेक घोषणा केल्या खर्या मात्र आता त्या घोषणांचे पैसे सर्वसामान्यांच्या खिशातून काढण्यासाठी विविध क्षेत्रात भाववाढ करण्यास सरकारने सुरुवात केली आहे. आरोग्यासाठी लागणार्या अत्यावश्यक औषधांच्या किंमतीमध्ये तब्बल 10 टक्क्याने वाढ करण्याचा मानस राज्य सरकारचा असल्याने सर्ववासामन्यांना जगणे मुश्किल होऊन बसणार आहे तर 1 एप्रिलपासून अडीच रुपयांनी वीज महागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वीज (पान 7 वर)
दरवाढीचा शॉक सर्वसाामन्यांना बसणार आहे. दुसरीकडे मुंबई-पुणे एक्स्प्रेस टोलच्या दरात तब्बल 18 टक्क्याने वाढ केली जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांचा प्रवास महागणार आहे. आर्थिक चणचणीत असलेल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला आता महागाईला सामोरे जावे लागणार आहे.
सर्वसामान्यांचे खिशे रिकामे करण्याची सरकारची गतीमानता -राष्ट्रवादी
येत्या एक एप्रिलपासून विविध क्षेत्रात भाववाढ होत असल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारच्या या भूमिकेवर सडकावून टीका केली. अर्थसंकल्पात वारेमाप घोषणांची खैरात करून अधिवेशन संपल्या संपल्या सर्वसामान्यांच्या खिशातच हात घालून त्यांचे खिशे रिकामे करण्याची सरकारची गतिमानता खरचं थक्क करणारी आहे.