गेवराई तालुक्यातील राजापूर येथे घडली घटना
बँकेसह खासगी लोकांचे होते पैसे
गेवराई/बीड (रिपोर्टर) मराठवाड्यामध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणार्या शेतकर्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दररोज राज्यात 8 पेक्षा जास्त शेतकरी मृत्युला कवटाळतात. बीड जिल्ह्यात सर्वात जास्त आत्महत्या होत असल्याचे पहावयास मिळते. गेवराई तालुक्यातील राजापूर येथील 40 वर्षीय शेतकर्याने बँक आणि खासगी कर्जाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. सदरील शेतकर्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
कर्जबाजारीपणा, नापिकी व शेती मालाला नसणारा भाव यामुळे शेेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. राज्यातल मराठवाडा विभागात शेतकरी आत्महत्यांची संख्या जास्त आहे. राज्य आणि केंद्र सरकार शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना आखत नाही. राज्यात दररोज 8 शेतकरी आत्महत्या करतात. मराठवाडा विभागात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात होतात. गेवराई तालुक्यातील राजापूर येथील रामदास अंबादास उबाळे (वय 40 वर्षे) या शेतकर्याला तीन एकर जमीन आहे. सदरील शेतकर्याकडे बँक आणि खासगी लोकांचे पैसे होते, हे कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून त्याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले.