उपसरपंचाच्या टोळीने कोयते फिरवत घातली दहशत
नेकनूर (रिपोर्टर) ग्रामसभा सुरू असताना उपसरपंचाने ग्रामसभेत गोंधळ घालून सरपंच पतीस मारहाण करत महिला सरपंचास शिवीगाळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार काल पाटोदा बेलखंडी येथे घडला. उपसरपंचाने गावात दहशत माजवण्याच्या उद्देशाने गाड्यामध्ये काठ्या, कोयते, चाकू, आडकीते असे घातक शस्त्र आणले होते. या प्रकरणी पाच ते सहा जणांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेलखंडी पाटोदा येथे काल ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेमध्ये उपसरपंच बबन आश्रुबा माने याने व त्याच्या समर्थकाने चांगलाच गोंधळ घातला. सरपंच पती यांना मारहाण करण्यात आली. त्याचबरोबर सरपंच अर्चना सतीश वनवे यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. गावात दहशत माजवण्याच्या उद्देशाने उपसरपंचाने गाड्यामध्ये काठठ्या कोयते, रामपुरी चाकू, अडकीते यासह इतर शस्त्र आणले होते. या प्रकरणी अर्चना सतीश वनवे यांच्या फिर्यादीवरून आरोपी बबन आश्रुबा माने (उपसरपंच), महादेव बापुराव जाधव (सदस्य), बाबासाहेब भीमराव कुचेकर, लहु लक्ष्मण तुपे (रा. पाटोदा बेलखंडी), तुषार अशोक पवार (रा. पालवण), दिनेश दशरथ ओव्हाळ (रा. काठवडा ता. बीड) यांच्या विरोधात कलम 143, 147, 149, 323, 504, 506, भा.दं.वि.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस कॉ. नागरगोजे, डिडूळ, मुरुमकर, ढाकणे हेक रत आहेत. या प्रकरणातील आरोपी दुपारपर्यंत अटक नव्हते.