Thursday, July 29, 2021
No menu items!
Homeबीडजिल्ह्याला १६ हजार लस उपलब्ध; लसीकरण सुरू परदेशवारी करणार्‍यांना घरपोच लस दिली...

जिल्ह्याला १६ हजार लस उपलब्ध; लसीकरण सुरू परदेशवारी करणार्‍यांना घरपोच लस दिली जाणार


बीड (रिपोर्टर):- गेल्या महिनाभरापासून बंद असलेले लसीकरण आज जिल्ह्याच्या ९८ केंद्रांवर सुरू झाले असून यामध्ये ६८ केंद्रांवर दुसरी लस तर ३० केंद्रांवर पहिली लस दिली जात आहे. जिल्हा प्रशासनाकडे १६ हजार डोस उपलब्ध झाले आहेत. आज ३० ते ४४ वयोगटातील नोंदणीकृत नागरिकांना लस देणे सुरू असून ४४ पेक्षा अधिक वयाच्या नागरिकांना दुसरा लस देण्यात येत आहे. शिक्षणासाठी अथवा अन्य कारणासाठी देशाबाहेर जाणार्‍या विद्यार्थ्यांसह नागरिकांना घरपोच लसीकरण मोहीम जिल्हा प्रशासनाने हाती घेतली आहे. जिल्ह्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जलदगतीने लसीकरण होणे गरजेचे आहे. प्रशासनही लस उपलब्ध झाल्याबरोबर तेवढ्याच्या ताकतीने लसीकरण मोहीम हाती घेताना दिसून येत आहे.


बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेने जास्त असल्यामुळे बीड जिल्ह्यात जास्तीत जास्त लसीकरण होणे गरजेचे आहे. इतर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आणि बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ही मोठी असून आजही दीडशे ते दोनशे कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाचा टक्काही दहापेक्षा जास्त असल्याने जिल्ह्यात सशर्त लॉकडाऊन सुरू आहे. त्यात गेल्या महिनाभरापासून लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातले लसीकरण शंभर टक्के बंद होते. मात्र आज जिल्हा प्रशासनाकडे १६ हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्याबरोबर आरोग्य विभागाने जिल्ह्यातील ९८ केेंद्रांवर लसीकरण सुरू केले आहे. १६ हजार लसीचे वितरण करताना आरोग्य विभागाने ३० ते ४४ वयोगटातील नोंदणीकृत नागरिकांना पहिली लस दिली जात आहे तर ४४ पेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना दुसरी लस दिली जात असून लसीकरणाच्या पहिल्या दिवशी अनेक लसीकरण केंद्रांवर नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. आतापर्यंत जिल्ह्यात पहिला डोस १ लाख ७० हजार ७६४ नागरिकांनी घेतला तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या ४३ हजार इतकी आहे.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!