किल्ले धारूर (रिपोर्टर) शहरामध्ये बिना नंबर, लायसन नसणार्या गाड्यावर 8 एप्रिल शनिवार रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली 40 दोन चाकी वाहनावर कारवाई करून जवळपास 20 हजार रुपये दंड आकारण्यात आला.
शहरामध्ये शाळा, कॉलेज ,बाजार तळ अशा गर्दीच्या ठिकाणी कर्कस आवाजामध्ये दोन चाकी वाहनांची पळवण्याची चढावढ पाहायला मिळायची, तसेच या दोन चाकी मोटरसायकलवर नंबर नसायचा, चालवणार बिगर लायसनचा असून अशा वाहनधारकांचा शहरामध्ये सर्वसाधारण नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता या वाहन पळवण्यामध्ये लहान मोठे अपघात होत असून पालक चिंतेमध्ये असायचे की आपल्या मुलाने गाडी घेऊन गेलाय वापस परत सुखरूप येतो का नाही कारण या नवतरुणांमध्ये गाड्या पळवण्याचे फ्याड निर्माण झाले आहे यामुळे यांना वचक बसण्यासाठी कारवाईची गरज होती याची दखल घेऊन धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ एप्रिल शनिवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बिना नंबर, लायसन नसणार्या 40 वाहन चालकावर कारवाई करत जवळपास 20 हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करून वाहन चालकांना तबी दिली या कारवाईने सुसाट पळणार्या वाहन चालकांना काही प्रमाणात पोलिसांचा वचक बसवून यापुढे वाहन चालताना शिस्तीने वाहन चालवतील यामुळे पालक वर्गामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे या कारवाईमध्ये बीट अमलदार अशोक गवळी , चंद्रकांत गुंड ,वाहतूक कर्मचारी जमीर शेख, सत्यप्रेम मिसाळ, संतोष बहिरवाळ, डीएसपी चे परमेश्वर वखरे तसेच महिला पोलीस कर्मचारी केते, शिपाई चंदू आधी कर्मचारी उपस्थित होते