Tuesday, December 7, 2021
No menu items!
Homeक्राईमजिल्ह्यात कोणी गुन्हाच करू नये, असे काम करा -ना.धनंजय मुंडे कोविडच्या कार्यकाळात...

जिल्ह्यात कोणी गुन्हाच करू नये, असे काम करा -ना.धनंजय मुंडे कोविडच्या कार्यकाळात पोलिसांचं महत्वाचं योगदान


बीड (रिपोर्टर):- बीड जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. गुन्ह्यांचा तपास करताना पोलिसांना साधनांची कमतरता असल्यामुळे गुन्हा घडल्याच्या ठिकाणी तात्काळ पोहचता येत नव्हते, ही बाब ध्यानी घेऊन पोलिस दलाला साधनं देण्याचा निर्णय घेण्यात आला. या साधनांच्या सहाय्याने पोलीस दलाने अशी कामगिरी करावी की, जिल्ह्यामध्ये इथून पुढे कुणीच गुन्हा करण्याची हिम्मत करू नये आणि राज्यामध्ये बीड जिल्हा पोलीस दलाची मान उंचवावी, असे प्रतिपादन राज्याचे सामाजीक न्यायमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

pink van


ते बीड येथील जिल्हा पोलीस दलाकडून आयोजीत कार्यक्रमामध्ये बोलत होते. या वेळी जिल्हा नियोजन समितीमधून बीड जिल्हा पोलीस दलाला १५१ दुचाकी आणि ९ चारचाकी वाहने आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी पालकमंत्री मुंडे बोलत होते. या वेळी आ. संदीप क्षीरसागर, आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी रविंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी यांनी केल्यानंतर पालकमंत्री मुंडे पुढे बोलताना म्हणाले की, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पोलीस दलाकडे वाहने नसल्याची बाब समोर आली. बीड जिल्हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे. गुन्ह्याचा तपास करताना आणि गुन्हा घडला त्या ठिकाणी पोलीसांना साधनाअभावी लवकर पोहचता येत नव्हते. त्यामुळे जिल्हा नियोजन मंडळातून पोलीस दलाला ही वाहने देण्यात आली. सोबतच बीड जिल्हा पोलीस दलाने गेल्या वर्षभरात केलेल्या कामगिरीचा आढावा ध्यासपर्व या पुस्तकातून पोलीस दलाने मांडलेला आहे. यापूर्वी ग्रामीण भागात बिट अमलदार म्हणून पुरुष पोलीस अमलदाराकडेच या बिटची जबाबदारी दिली होती मात्र आजपासून पोलीस ठाणेअंतर्गत एका बिटची जबाबदारी महिला पोलीस कर्मचार्‍यांकडे देण्यात येत असून हा प्रयोग राज्यात प्रथमच बीड जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात येत आहे. सोबत महिलांवरील गुन्ह्यासाठी पिंक मोबाईल पथकही स्थापन करण्यात आला आहे. या पिंक मोबाईल पथकाला ९ वाहने देण्यात आले असून इथून पुढे सर्वसामान्य गुन्जह्यातच काय तर राज्यात महिलांच्या गुन्हेगारीतही बीड जिल्ह्यात कमी प्रमाण झाले पाहिजे, असेही मुंडे यांनी या वेळी सांगितले. कोविडच्या काळातही कमी साधनांवर पोलीस दलाने अतिशय चांगली कामगिरी केल्याचे कौतुकही पालकमंत्री मुंडेंनी केले. या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पापा मोदी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद शिक्षण सभापती बजरंग सोनवणे, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्यासह पोलीस विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

error: Content is protected !!