बीड (रिपोर्टर) बीड जिल्हा परिषदेअंतर्गत प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापकपदाची शिक्षण विभागाने नुकतीच सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली आहे. एकूण 485 शिक्षकांचा या यादीमध्ये समावेश असून यापैकी 69 शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून बढती द्यावयाची आहे. जे मुख्याध्यापक पदाला पात्र आहेत मात्र सेवा ज्येष्ठता यादीमध्ये ज्यांचे नाव आहेत, अशांनी आक्षेप नोंदविण्यासाठी ही यादी प्रसिद्ध केली असून आतापर्यंत 36 लोकांनी या यादीवर आक्षेप घेतला असून 33 लोकांचे समाधान झाल्याचे शिक्षण विभागाच्या सुत्रांनी सांगितले.
बीड जिल्ह्यातील 69 शिक्षक हे सेवा निवृत्त झाल्याने त्यांच्या जागी बढतीने पदस्थापना देण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकातून मुख्याध्यापक पदासाठी पात्र असलेल्या शिक्षकांची सेवाजेष्ठता यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. यामध्ये त्यांनी नोकरीला केलेली सुरुवात, त्यांच्या नोकरीचा कालावधी आणि निवडीचा प्रवर्ग यानुसार 485 शिक्षक हे मुख्याध्यापक पदासाठी टप्प्या टप्प्याने पात्र आहेत. त्यामध्ये पहिल्या एक ते 69 शिक्षकांना मुख्याध्यापक म्हणून शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी मुख्याध्यापक म्हणून बढती द्यावयाची आहे. मात्र अनेक शिक्षक हे आपली मुख्याध्यापक म्हणून बढती नाकारतात, या 485 पैकी एका पदाला तीन असे शिक्षक या मुक्याध्यापक पदासाठी मुलाखत आणि कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात आले आहेत. ज्यांचा या यादीवर आक्षेप आहे, अशांनी पुरवायासह आपला आक्षेप नोंदवण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केल्यानुसार 36 शिक्षकांनी या यादीवर आक्षेप घेतला. यामधील 33 शिक्षकांचे शंकानिरसन झाले असून तीन शिक्षकांचा आक्षेपही दूर करण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाचे कक्षाधिकारी बिजलवाड यांनी सांगितले.