पेठ बीड पोलिसांचे दुर्लक्ष
बीड (रिपोर्टर) शहरामध्ये चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. रात्री-अपरात्री चोर्या तर होतच आहेत पण काही ठिकाणी दिवसाढवळ्या चोरटे नागरीकांना लुटू लागले आहेत. पेठ बीड भागातील यशवंत उद्यानामध्ये दिवसभर सावलीला काही नागरीक बसलेले असतात. याठिकाणी चोरटे नागरीकांच्या खिशातील पैसे, मोबाईल जबरदस्तीने काढून घेत आहेत व त्यांना धमक्या देतात. या प्रकाराकडे पेठ बीड पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.
पेठ बीड भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर यशवंत उद्यान आहे. या उद्यानामध्ये दिवसभर काही नागरीक विश्रांतीसाठी आश्रय घेत असतात. याचाच गैरफायदा चोरटे उचलतात. नागरिकांच्या खिशातील मोबाईल, पैसे जबरदस्तीने काढून घेत आहेत. पैसे काढून घेताना चोरटे संबंधितांना धमक्या सुद्धा देतात. सदरील हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू अहे. याकडे पेठ बीड पोलीस दुर्लक्ष करत असून सदरील चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करून त्यांच्या मुसक्या अवाळाव्यात, अशी मागणी या भागातील नागरीकांतून केली जात आहे.