Saturday, September 18, 2021
No menu items!
Homeबीड27 व 28 जुलैला जि.प.कर्मचार्‍यांच्या बदल्या

27 व 28 जुलैला जि.प.कर्मचार्‍यांच्या बदल्या

बीड (रिपोर्टर):-प्रत्येक वर्षी 31 मे रोजी होणार्‍या बदल्या या वर्षी 27 आणि 28 जुलैला समोपदेशनाने करण्यात येणार आहे. या बदल्यांमध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4 च्या कर्मचार्‍यांचा समावेश असून यामध्ये 10 टक्के बदल्या या प्रशासकीय कारणास्तव तर 5 टक्के बदल्या या विनंतीवरून करण्यात येणार आहे.
   गेल्या वर्षी कोरोनामुळे या बदल्या करण्यात आल्या नव्हत्या. यावर्षी बदल्या करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिली असून 27 आणि 28 जुलैला या बदल्या सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात समोपदेशनाने होरार आहते. 27 तारखेला आरोग्य, ग्रामीण पुरवठा, लघु पाटबंधारे, पशुसंवर्धन व कृषी या विभागाच्या बदल्या करण्यात येणार आहे तर 28 तारखेला लेखा व वित्त विभाग, बांधकाम विभाग, पंचायत, शिक्षण, महिला आणि बालकल्याण व सामान्य प्रशासन विभागातील या बदल्या प्रस्तावीत आहेत. यामध्ये संबंधित विभागाच्या आस्थापना सांभाळणार्‍या विभागाने बदली पात्र कर्मचार्‍यांची संचिका सामाजिक न्याय विभागाच्या सभागृहात घेऊन उपस्थित राहण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांनी काढलेले आहेत.

Most Popular

error: Content is protected !!