रुग्णालयातील कर्मचार्यांना अॅडमिट करण्याचे दिले निर्देश
बीड (रिपोर्टर): जिल्हा रुग्णालयामध्ये आज दिव्यांगांची मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दीपा मुंढे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी गेटमधून कार्यक्रमस्थळाकडे जात असतांना त्यांची नजर कचर्यात पडलेल्या एका व्यक्तीकडे गेली. सदरील व्यक्तीस तात्काळ रुग्णालयात अॅडमिट करण्याचे निर्देश त्यांनी संबंधीत कर्मचार्यांना दिले. हा व्यक्ती कुठला आहे हे मात्र समजू शकले नाही.
जिल्हा रुग्णालयामध्ये दिव्यांगाची मोफत तपासणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दीपा मुंढे या हजर होत्या. कार्यक्रमास्थळी जात असतांना त्यांना गेटच्या बाजुच्या कचर्यात एक व्यक्ती आढळून आला. सदरील या व्यक्तीबाबत त्यांनी रुग्णालय प्रशासनाकडे विचारणा केली मात्र या व्यक्तीची ओळख पटली नाही. या व्यक्तीस तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.