Friday, January 28, 2022
No menu items!
Homeमहाराष्ट्रमुंबईउद्धव ठाकरेंनी दिला चिपळुणच्या व्यापार्‍यांना दिलासा दोन दिवसांपासून मुख्यमंत्री पुरग्रस्त भागात

उद्धव ठाकरेंनी दिला चिपळुणच्या व्यापार्‍यांना दिलासा दोन दिवसांपासून मुख्यमंत्री पुरग्रस्त भागात

तुमच्या दुकानाच्या सामानाची नासधूस झाली, तुम्ही काळजीकरू नका, तुम्हाला इजा झाली नाही ना, तुम्ही सुरक्षित आहात ना, तुमच्या मालाचं बघू ते आमच्यावर सोडा
मुख्यमंत्र्यांकडून पुरपरिस्थितीचा आढावा
मुंबई (रिपोर्टर):- तुमच्या दुकानातील सामानाची नासधूस झाली, तुम्ही त्याची काळजी करू नका, तुम्हाला इजा झाली नाही ना, तुम्ही सुरक्षित आहात ना, तुमच्या मालाचं बघू ते आमच्यावर सोडा, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिपळुणमधील व्यापार्‍यांना दिलासा दिला. या वेळी अनेक व्यापार्‍यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडली, एका महिलेने तर मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत ‘आम्हाला सोडून जाऊ नका, आम्हाला मदत करा, आश्‍वासन नको, असे म्हटले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी त्या महिलेचे गार्‍हाणे ऐकून घेतले. दुपारी मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू असून पुरग्रस्तांना कुठल्या मदतीची घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घर सोडत नसल्याची टीका विरोधक सातत्याने करत होते. मात्र महाराष्ट्रातील पुरपरिस्थिती पाहि-ल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपासून थेट घटनास्थळावर जावून याची देही याची डोळा पाहणी करण्यास सुरुवात केली. चिखल तुडवत मुख्यमंत्री दुर्घटनास्थळी गेले. यामध्ये मृत्यू पावलेल्या लोकांच्या परिवाराला भेटून त्यांचे सांत्वन केले, त्यांना आधार दिला. आज मुख्यमंत्री थेट चिपळुणमध्ये आले. दुपारी एक वाजता बाजार पेठेत पोहचले. या वेळी त्यांनी गांधी चौकातील दुकानदारांच्या भेटी घेतल्या. त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली. दोन वेळा मुक्यमंत्र्यांनी थांबून व्यापार्‍यांसोबत चर्चा केली. अनेक दुकानदारांनी पानावलेल्या डोळ्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडली. मुक्यमंत्री येणार म्हणून बाजार पेठेत प्रचंड गर्दी होती. या वेळी मुख्यमंत्र्यांसोबत परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री उदय सामंत, खा. विनायक राऊत, आ. भास्कर जाधव, मिलिंद नार्वेकर आणि मुख्य सचिव सीताराम कुटे उपस्थित होते. या वेळी उपस्थित व्यापार्‍यांनी आमचं होत्याचं नव्हतं झालं, आमचा माल भिजला, मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. असे म्हटले त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला इजा झाली नाही ना, तुम्ही सर्व सुरक्षित आहात ना, तुमच्या मालाचं बघू, आम्ही आहोत, काळजी करू नका, असं म्हटलं. मुख्यमंत्र्यांनी थेट घटनास्थळी जावून पाहणी करण्यास सुुरुवात केल्याने दुर्घटनाग्रस्त नागरिकांना आधार मिळत आहे.

Most Popular

error: Content is protected !!