बीड (रिपोर्टर) कचर्यामध्ये पडलेल्या एका व्यक्तीला जिल्हाधिकार्यांनी आरोग्य विभागाला रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश दिले होते. सदरील रुग्ण गंभीर अवस्थेत होता. उपचारा दरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाला. हा मयत कुठला आहे याची अद्याप ओळख पटलेली नाही.
दोन दिवसांपूर्वी एका व्यक्तीला जिल्हा रुग्णालयामध्ये अॅडमिट करण्यात आले होते. सदरील या व्यक्तीला 108 रुग्णवाहिकेने वडवणी येथून आणले होते. मात्र तो कचर्यामध्ये आढळून आला. या व्यक्तीस जिल्हाधिकार्यांनी रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले होते. उपचारानंतर काही तासांनी या रुग्णाचा मृत्यू झाला. सदरील व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही.