आष्टी रिपोर्टर ):- आष्टी नगरपंचायत ने फेब्रुवारी 2022 ते 2023 या कार्यकाळात खर्च केलेले वार्ड निहाय निधीचे विवरण व घेण्यात आलेले ठराव जनतेसमोर खुले करावे या
मागणीसाठी नगरसेवक महादेव दिलीप शिखरे यांचे धरणे आंदोलन केले असून तहसीलदार आष्टी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मी महादेव दिलीप शिखरे नगरपंचायत कार्यालय आष्टी येथील विद्यमान नगरसेवक असून नगरपंचायतने फेब्रुवारी 2022 ते 2023 या कार्यकाळात केलेल्या खर्चाचे वार्ड निहाय निधीचे विवरण जनतेसमोर खुले करावे तसेच या काळात घेण्यात आलेल्या सर्व ठराव जनतेसमोर मांडावे या मागणीसाठी आज दिनांक 25 मे रोजी सकाळी दहा वाजता पंचायत समिती आष्टी समोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते संपत सायकड यांच्यासह नगरसेवक व आंदोलन कर्ते उपस्थित होते










