चोरीच्या तपासासाठी श्वानपथकाला केले पाचारण
नेकनूर (रिपोर्टर) घरी कोणी नाही याची संधी साधून अज्ञात चोरट्याने एका शिपायाच्या घराचे कुलूप तोडून आतील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना रात्री शिक्षक कॉलनीमध्ये घडली. दुसरी चोरीची घटना याच भागात घडली असून शिक्षकाच्या घरातील मोटारसायकल चोरून नेली आहे. चोरीच्या तपासासाीं श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किसन नारायण कानडे (रा. शिक्षक कॉलनी, नेकनूर) हे आपल्या कुटुंबियांसमवेत गावी गेले होते. याच संधीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतील दोन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. आज सकाळी सदरील हा प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी एपीआय मुस्तफा शेख, पीएसआय पानपाटील, प्रशांत क्षीरसागर, दीपक खांडेकर, अनवणे हे दाखल झाले होते. चोरीच्या तपासासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. दुसरी चोरीची घटना याच भागात घडली. शिक्षक सदाशिव रोकडे यांची होंडा शाईन कंपनीची मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली.