बीड (रिपोर्टर) जून महिन्याचा दुसरा आठवडा येत आहे. तरी अदद्यापही महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झालेले नाही. 15 जूननंतर मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. शेतकर्यांनी खरीप पिकांच्या तयारीसाठी शेतीची मशागत जोमाने सुरू केली असून आता पावसाची प्रतीक्षा आहे.
दरम्यान पाऊस पडल्यानंतर लागवड करता यावी यासाठी अनेक शेतकरी कृषी दुकानदारांकडे विविध कंपनीचे बियाणे खरेदी करू लागले आहेत. बीड जिल्ह्यात कापसासह सोयाबीनची लागवड दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागवड होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.