बीड (रिपोर्टर) बीडच्या बसस्थानकात उपचाराअभावी तरफडत असलेल्या एका अनोळखी इसमाला बीड वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचार्यांनी जिल्हा रूग्णालयात काल दाखल केले होते. आज सकाळी त्या अनोळखी इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सरकारी दवाखान्यात वार्ड क्र.6 मध्ये उपचार घेत असलेल्या 55 वर्षीय अनोळखी इसमाचा सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या इसमाला कोणी ओळखत असेल तर शिवाजीनगर पोलिस ठाणे येथे 9423152496 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले.