Saturday, November 27, 2021
No menu items!
Homeक्राईमभर चौकातील हॉटेल पंचवटी मध्ये चोरी.,65000 रोकडसह मुद्देमाल लंपास.

भर चौकातील हॉटेल पंचवटी मध्ये चोरी.,65000 रोकडसह मुद्देमाल लंपास.


माजलगाव (रिपोर्टर)- शहरातील मुख्य रहदारीचा असणार्‍या भर आंबेडकर चौकातिल पंचवटी हॉटेल मध्ये आज रविवारी पहाटे चोरट्यांनी खिडकीतून प्रवेश करून 65 हजार रुपये नगदी रोकड सह मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सतत रहदारीचा असणार्‍या आंबेडकर चौकातील हॉटेल पंचवटी मध्ये अज्ञात चोरट्यांनी रविवारी पहाटे दोन ते चारच्या दरम्यान खिडकीतून प्रवेश केला.यावेळी चोरट्यांनी काऊंटर मध्ये शनिवारी दिवसभर केलेल्या व्यवसायातून जमा झालेली कॅश 65 हजार रुपये व दोन मोबाईल एक एम आय कंपनीचा ज्याची अंदाजित किंमत 12 हजार 500 तर दुसरा सॅमसंग कंपनीचा ज्याची किंमत 7 हजार रुपये व सीसीटीव्ही कॅमेर्‍याची डी व्ही आर मशीन अंदाजे किंमत 7 हजार रुपये असा एकूण 91 हजार 500 रुपयाचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान सदरील प्रकार सकाळी हॉटेल मालकाच्या लक्षात आला असून हॉटेल मालक ईश्वरलाल भगवानजी भट्ट यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयांविरोधात माजलगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे करत आहेत.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!