बीड (रिपोर्टर) : भाजप सरकारकडून हुकुमशाही पद्धतीने कारभार चालवला जात असून भाजपाच्या विरोधात आज बीडमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी केंद्र सरकारच्या निषेधार्थ प्रचंड प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. हे आंदोलन जिल्हाध्यक्ष अशोक येडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. आज सकाळी आम आदमी पार्टीच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. या वेळी अशोक येडे, रामधन जमाले, ज्ञानेश्वर राऊत, सुरेखाताई डोंगरदिवे, नासेर मुंडे, सुरज लांडगे, भीमराव कुटे, सय्यद सादेक, प्रवीण औसरमल, सुनिल दिघे, दादासाहेब सोनवणे, कृष्णा जगताप, रामेश्वर गव्हाणे, ज्ञानेश्वर शिंदे, रफिक पठाण, पंडित वाघमारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. आम आदमीच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने हुकुमशाही पद्धतीने कारभार करत असून त्याचा निषेध आज बीहमध्ये आम आदमी पार्टीने केला.