Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeबीडमहसूलचं पथक दंड देण्याऐवजी वसूली करतयं

महसूलचं पथक दंड देण्याऐवजी वसूली करतयं


बीड (रिपोर्टर)ः- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये शनिवार आणि रविवार असे दोन दिवस अत्यावश्यक सेवा वगळता इतर व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिलेले आहे. असे असतांना काही व्यापारी आपले व्यवहार सुरू ठेवतात. दुकान सुरू ठेवणार्‍या व्यापार्‍याविरोधात दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र काही व्यापार्‍यांशी महसूलचं पथक तडजोड करुन वसुली करु लागलं आहे. काल असाच एक प्रकार जालना रोडवर उघडकीस आला. फरशीच्या दुकानावर धाड मारली खरं मात्र या ठिकाणी तडजोड करुन पथक मोकळं झालं आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी दखल घेणं गरजेचं आहे.

बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याने शनीवार आणि रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येतात. असे असतांना काही व्यापारी व्यवहार सुरू ठेवतात. व्यवहार सुरू ठेवणार्‍या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यासाठी एका पथकाची निवड करण्यात आली. यामध्ये न.प,चा कर्मचारी, तलाठी, ग्रामसेवक, इत्यादींचा सहभाग आहे. हे पथक आपल्या सोयीनूसार कारवाया करत आहे. एखादं दुकान उघड असेल तर त्या दुकानदारांची शुटींग काढली जाते. आणि तडजोड झाली तर तडजोड केली जाते आणि नाही झाली तर मोठा दंड दिला जातो. काल जालना रोडवर एका फरशीच्या दुकानावर धाड मारली. दुकानाची शुटींग केली. मात्र पथकाने यात तडजोड करत दुकानदाराला दंड न देता स्वतःच्या खिशा गरम केला अशा पध्दतीच्या कारवाया होत असेल तर एक तर पुर्णतः लॉकडाऊन असला पाहीजे नाही तर सर्वांना सुट दिली पाहिजे. उगीच व्यापार्‍यांची आर्थीक लूटही नको आणि सर्वसामान्यांना त्रासही नको. कोरोनाच्या नावाखाली हा लूटा लूटीचा खेळ थांबवण्यात यावा.

Most Popular

error: Content is protected !!