नांदेड,लातुर आणि मुंबई येथील दलित अत्याचार घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षेची केली मागणी
वडवणी (रिपोर्टर):- नांदेड लातूर मुंबई जिल्ह्यात झालेल्या दलित अत्याचार घटनेतील आरोपींना शिक्षा ची फाशी व्हावी यासह अन्य मागण्यासाठी आंबेडकरी सम विचाराच्या पाच संघटनेचा विराट मोर्चा आज वडवणी तहसिलवर धडकला आहे.
वडवणी तहसिल कार्यालयावर बहुजन विकास मोर्चा, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, डिपीआय, स्मृतिशेष गौत्तमदादा भालेराव मित्र मंडळ यांच्या वतीने आज जन-आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.सदरील आंदोलन हे डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून विराट रँली काढत घोषणा देण्यात आल्या आहेत.तर वडवणी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात नांदेड,लातुर आणि मुंबई येथे झालेल्या दलित हत्याचा माईंड मास्टरचा तपास करावा, तिन्ही घटनेतील आरोपीना फाशीची शिक्षा व्हावी म्हणुन सरकारने विशेष आणि तज्ञ वकिलाची नेमणूक करावी, खून प्रकरणातील तिन्ही मयत कुंटुबाना 50 लाखाची राज्य सरकारने मदत करुन एकाला शासकिय सेवेत दाखल करुन घ्यावे, सदरील प्रकरणात स्थानिक पोलीसाची व मिलीभगत राजकिय पुढारी यांचा तपास करुन आरोपीला मदत करणाऱ्यावर देखील मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या प्रकरणाचा तपास सीबीआय / सीआयडी मार्फत करावा, सदरील प्रकरणाचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालवावा, मयत कुंटुबियांना पोलीस संरक्षण द्यावे, अट्रोसिटी अँक्ट गुन्ह्याची कडक अंमलबाजवणी करुन आरोपीना किमान एक वर्ष तरी जामिन नामंजूर व्हावा असा कायदा करावा यासह अन्य मागण्याचे निवेदन देण्यात आले आहे. तर या विरोट मोर्चाला गोर सेना, अखिल भारतीय किसान सभा,समयक जनता पार्टीने पाठिंबा देत अत्याचार घटनेतील आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणी करत पठिंबा दिला आहे. यावेळी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे,जेष्ठ नेते भिमराव उजगरे,सुभाष साळवे, नवनाथ धाईजे,अण्णासाहेब मस्के, अमोल शेरकर,नवनाथ धाईजे, बाबासाहेब वाघमारे,अकबर पठाण, अविनाश झोडगे, विलास कारके, बाबासाहेब साळवे, जगदिश फरताडे, संजय पवार,अप्पासाहेब राठोड, चरणराज वाघमारे, अश्विनकुमार डावरे,महादेव आवाड, अरुण आवाड, अमोल पौळ, रमेश गवळी, तुकाराम गवळी, लक्ष्मण कसबे, अज्रुन पायके, आकाश पाटोळे, राहुल तांगडे, दशरथ कुचेकर, शिवाजी झोडगे, असलम शेख, महारुद्र मुंडे, विजय मुजमुले, विश्वनाथ उजगरे, विनोद काकडे, संजय डोंगरे, सुंदर चव्हाण, बिभीषण डोंगरे, धनराज खळगे, विनोद काकडे, एजाज शेख, महिंद्रा सोनवणे, आमिर शेख, नाजिम पठान,आमेर शेख, आजीम पठन, मुजाहिद शेख, वाजिब कुरेशी यांच्यासह आंबेडकरी समविचाराचे कार्यकर्ते पदाधिकारी नेतेमंडळी हजाराच्या संख्येने उपस्थित होते.