बीड (रिपोर्टर) कोरोनाच्या दोन वर्षानंतर यावर्षी शैक्षणीक वर्ष वेळेवर सुरू झाले. आज शाळेची घंटा वाजली. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा किलबिलाट दिसून आला. प्राथमीक शाळेमध्ये विद्यार्थ्याला पहिल्याच दिवशी पुस्तकाचे वाटप करण्यात आले. जिल्ह्यातल्या शहरी भागाासह ग्रामीण भागासह शाळा भरल्यामुळे मुलांत उत्साह दिसून आला.
कोरोनाच्या संसर्ग कार्यकाळात दोन वर्ष शाळा भरलेल्या नव्हत्या. यावर्षी कोरोनाची तिव्रता अत्यंत कमी आहे.शालेय विभागाने 15 जून पासून शाळा सुरू करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर आजपासून शाळाला सुरूवात झाली.आज शाळेची घंटा वाजल्याने मुलांमध्ये उत्साह दिसून आला. शहरी भागासह ग्रामीण भागात शाळात किलबिलाट दिसून आला. पहिली ते आठवी पर्यंत मुलांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप केले जातात. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांना पुस्तकाचे वाटप करण्यात आले. पहिलीची प्रवेश प्रकिया आजपासून सुरू झाली. मुलांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले.