टार्गट मुलांमुळे क्लासेस परिसरातील नागरीकांना होवू लागला त्रास
बीड (रिपोर्टर)ः- शहरामध्ये विविध ठिकाणी क्लासेसचे पेव फुटलेले आहे. क्लासेस परिसरात कुठलीही सुरक्षा नसते. कधी कधी दोन गटात हाणामार्या होतात तर काही वेळा मुलींची छेडछेड होते. पांगरी रोडवरील तिडके क्लासेस समोर आज सकाळी 9.30 वाजता दोन विद्यार्थ्यात प्रचंड मारामारी झाली. या दोन्ही विद्यार्थ्यांत दोन्ही बाजूने उचवणारे विद्यार्थीच होते. मध्यस्थी करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. अशा या भांडणामुळे क्लासेस परिसरातील रहिवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
बीड शहरातील पांगरी रोड, माने कॉम्पलेक्स परिसर, नवगण कॉलेज रोड, बार्शी रोड यासह अन्य भागामध्ये क्लासेस मोठ्या प्रमाणात आहे. क्लासेसच्या परिसरात कुठलीही सुरक्षा नाही. काही वेळा टुकार मुलं आपसात मारमार्या करतात. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण होत असते. मुलींचीही छेडछाड होते. आज सकाळी पांगरी रोड येथील तिडके क्लासेस समोर दोन विद्यार्थ्यांत प्रचंड प्रमाणात मारामारी झाली. दोन्ही विद्यार्थ्यांना दोन्हीकडून उचवणारे विद्यार्थीच होते. मध्यस्थी कोणीही करायला तयार नव्हतं. जवळपास 15 ते 20 मिनीट या मारामार्या सुरू होत्या. अशा या मारामार्यामुळे परिसरात राहणार्या रहिवाश्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान क्लासेस वाल्यांनी आपली सुरक्षा व्यवस्था करायला हवी. त्याच बरोबर पोलीस प्रशासनाचा टार्गटावर धाक असायला हवा नसता एक दिवस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.