Friday, January 28, 2022
No menu items!
Homeक्राईमइनामी जमीन प्रकरणात आघाव पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस

इनामी जमीन प्रकरणात आघाव पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची शिफारस

बीड (रिपोर्टर):- जिल्ह्यातील देवस्थान आणि मस्जिद दर्गाच्या जमीनी काही लोकांच्या नावावर करत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील हे अडचणीत आले आहेत. मावळते जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी या प्रकरणात आगाव पाटील यांच्यावर गुन्हे दाकल करण्याची शिफारस करणारा अहवाल विभागीय आयुक्तांना दिला आहे. आघाव पाटील सारख्या अधिकर्‍यांवर केंद्रेकर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागून आहे.
देवस्थान जमीनीसंदर्भात निर्णय देताना भूसुधारचे जिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली आहे. त्यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचा अहवाल बीडचे मावळते जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी विभागीय आयुक्तांना दिला आहे. या अहवालावरून संबंधिताविरोधात गुन्हे दाखल करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांनी सरकारला केल्याचे सांगण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात देवस्तानाच्या जमीनी मोठ्या प्रमाणात आहेत. देवस्थान जमीनीच्या बाबतीत मदत माश आणि खिदमत माश असे दोन प्रकार असतात यातील मदतमाश जमीन हस्तांतर होऊ शकते मात्र खिदमत माश जमीन देवस्थानाच्या नावावरून इतरांकडे हस्तांतरीत होत नाही. मात्र अशा हजारो एकर जमीनी बेकायदा पद्धतीने खालसा करून त्या खासगी व्यक्तीच्या घशात घालण्याचे प्रकार समोर आले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!