गेवराई (रिपोर्टर): गेवराई तालुक्यातून वाळुचा अवैध उपसा सुरुच आहे. आज महसूल विभागाने जळगाव नागरे वस्तीवर वाळू घेऊन जाणारा हायवा पकडून कारवाई केली.
एका हायवाद्वारे अवैधरित्या वाळू जात असल्याची माहिती महसूल विभागाला झाल्यानंतर तहसीलदार संदीप खोमणे, जितेंद्र लेंडाळ, पखाले, मंडळ अधिकारी किरण दांडगे, निखिल तपसे, अक्षय डोके, माणिक पांढरे, शुभम गायकवाड, विठ्ठल सुतार, गजानन शिंगणे, कुंदन काळे यांनी हायवा पकडून कारवाई केली. सदरील कारवाई संगम जळगाव नागरे वस्ती या ठिकाणी करण्यात आली.