बीड (रिपोर्टर): राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने काल बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये बीड विभागातील अधिक्षक पदावर कार्यरत असणार्या दोन अधिकार्यांचा समावेश असून शालेय पोषण आहाराचे अधिक्षक अजय बहीर यांची बदली केज पंचायत समितीमध्ये करण्यात आली आहे तर माध्यमिक शिक्षण विभागात अधिक्षक पदावर कार्यरत असणारे राजेश खटावकर यांची बदली जालना येथील प्राथमिक शिक्षण विभागात वेतन निश्चिती पथक अधिक्षक या पदावर करण्यात आलेली आहे.
काल राज्य शासनाने केलेल्या बदल्यांमध्ये बीड येथील या दोन अधिकार्याचां समावेश असून गेल्या पाच वर्षांपासून शिक्षण विभागात अजय बहीर कार्यरत आहेत.
माजलगाव पंचायत समितीमध्ये अधिक्षक पदावर ते कार्यरत असताना अनेक वेळा त्यांना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) या पदाची जबाबदारी पार पाडावी लागली तर राजेश खटावकर हे माध्यमिक शिक्षण विभागात अधिक्षक पदावर कार्यरत होते. शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवणे आणि समजून घेणे अशा प्रकारची प्रतिमा खटावकर यांची होती. त्यामुळे ते शिक्षक वर्गात प्रिय होते. दरम्यान अजय बहीर यांच्याकडेही एक अभ्यासू अधिकारी म्हणून पाहिले जाते. सोबतच ते आपले बदली रद्द करण्यासाठी मुंबई मंत्रालयात ठाण मांडून बसल्याचेही कळते.