वडवणी (रिपोर्टर):- गायरान जमिनी संदर्भात काढलेल्या नोटीसा रद्द करुन कसत असलेल्या नागरिकांच्या नावे जमिनी करण्यात याव्यात तसेच राज्यात झालेल्या दलित अत्याचार घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी यासह अन्य मागण्यासाठी आज वडवणी तहसिल कार्यालयावर रिपाई व मानवी हक्क अभियानाच्या वतीने हजारोंच्या उपस्थित महामोर्चा धडकला आहे.
सदरील महामोर्चा आज दुपारी बारा वाजता विश्वरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरुवात होत छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्ग वडवणी तहसिल कार्यालयावर गायरान जमिनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, अत्याचार घटनेतील अरोपीला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे यासह अन्य घोषणा देत रिपाईचे तालुकाध्यक्ष महादेव उजगरे व मानवी हक्क अभियानाचे तालुकाध्यक्ष विष्णु मुजमुले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा धडकला असून यामध्ये कसत
असणा-या भुमीहीन गायरान धारकांना दिलेल्या नोटीसा तात्काळ रद्द कराव्यात, सरकारी गायरान जमीनीवर बांधलेल्या घरधारकांना दिलेल्या नोटीसा रद्द करण्यात याव्यात, सन 1990 च्या गायरान जमीन शासन परिपत्रकाची मुदत वाढवून सन 2005 पर्यंतचा जी.आर.काढुन गायरान नावांवर करावेत, नांदेड जिल्ह्यातील गोंधळ येथील अक्षय भालेराव हत्या प्रकरणातील मारेकर्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, लातूर जिल्ह्यातील रेणापुर येथील गिरधारी तापघाले हत्याप्रकरणातील मारेकर्यांना आजची शिक्षा देण्यात यावी, बीड येथील भारत अवचार यांना आत्महत्येस प्रवृत्त करणार्यास कडक शासन करण्यात यावे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेतील अनुदान पाच लाखापर्यंत करण्यात यावे, रमाई आवास घरकुल योजनेमध्ये शहरी व ग्रामीण भागात पाच लाख रुपयाचे अनुदान देण्यात यावे, एससी एसटी बजेटचा कायदा तात्काळ करण्यात यावा.यासह विविध मागणीचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले आहे. यामोर्चात मानवी हक्क आभियानाचे जिल्हाध्यक्ष राजेश घोडे, भाई महादेव उजगरे, परमेश्वर उजगरे, बबनराव मुजमुले, अप्पाराव मुजमुले, प्रकाश तांगडे, दिलीप अवचार, राजेश उजगरे, सतिष उजगरे, बंडु मुजमुले, दादा उजगरे, शिवाजी झोडगे,महादेव मुजमुले,सुशिल जावळे, यांच्यासह महिला, पुरुष हजारोंच्या जणाची उपस्थिती होती.