संत दर्शनाने आजच्या दिवसाचा शेवट गोड – धनंजय मुंडे
मुंबई (रिपोर्टर)- श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती महंत न्यायाचार्य ह.भ.प. डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी बुधवारी सायंकाळी राज्याचे नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांची मुंबई येथे सदिच्छा भेट घेऊन शुभाशीर्वाद दिले.
यावेळी डॉ. नामदेव शास्त्री महाराज व धनंजय मुंडे यांनी एकमेकांचा सत्कारही केला. धनंजय मुंडे यांनी महाराजांचे आशीर्वाद घेतले. आज सर्व सहकार्यांचे मिळालेले प्रेम व सदिच्छा यांसह संत दर्शन व भगवानगडाच्या आशीर्वादाने दिवसाचा शेवट गोड झाला, असे मत यावेळी धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.बुधवारी दुपारी झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला मिळालेला भव्य प्रतिसाद व त्यानंतर भगवानगडाचे महंत यांनी दिलेला आशीर्वाद यामुळे धनंजय मुंडे यांचा आनंद द्विगुणित झाल्याचे मुंडे म्हणाले. या वेळी निलेश आघाव यांची उपस्थिती होती.