Tuesday, January 25, 2022
No menu items!
Homeकोरोनाधारूर भाजपच्यावतीने गोंधळी वाद्य वाजवून मंदिरे उघडण्यासाठी अंबाचंडी येथे आंदोलन

धारूर भाजपच्यावतीने गोंधळी वाद्य वाजवून मंदिरे उघडण्यासाठी अंबाचंडी येथे आंदोलन


किल्ले धारूर( रिपोर्टर) धारुर तालुक्यातील सर्व मंदिरे उघडण्यात यावेत यासाठी धारूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील प्रसिद्ध मंदिर अंबाचंडी माता येथे भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूपसिंह हजारी यांच्या नेतृत्वाखाली गोंधळी वाद्य वाजवून आंदोलन करण्यात आले.


महाराष्ट्र शासनाने बियरबार उघडले ,सर्वकाही उघडले परंतु सर्वांचे श्रद्धास्थान मंदिरे उघडले नाहीत यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे शासनाने ही मंदिरे घडावीत यासाठी आज घंटानाद, शंखनाद व गोंधळी वाद्य वाजवून या स्वरूपाचे आंदोलन आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केलेयावेळी धारूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ स्वरूपसिंह हजारी, विनायक शिनगारे ,उपनगराध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, चोरंबा येथील बालासाहेब चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष मायकर,तालुकाध्यक्ष बालासाहेब चोले ,रमेश नखाते, शहराध्यक्ष दत्ता भाऊ धोत्रे, प्रदीप पुजदेकर इत्यादी उपस्थित होते

Most Popular

error: Content is protected !!