राष्ट्रवादी पक्षावर हक्क कुणाचा हा वाद आयोगाकडे गेल्याने पुढे काय होणार याविषयी चर्चा सुरू आहेत. त्यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया देत कायदेशीर बाजू सांगितली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीवरील दाव्यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं मोठं विधान (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभाग घेतला. तसेच निवडणूक आयोगाकडे जात थेट राष्ट्रवादी पक्षाचं अध्यक्षपद, पक्षाचं नाव आणि पक्षचिन्ह असं सगळ्यावरच दावा केला. यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी पक्षावर हक्क कुणाचा हा वाद आयोगाकडे गेल्याने पुढे काय होणार याविषयी चर्चा सुरू आहेत. त्यावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी प्रतिक्रिया देत कायदेशीर बाजू सांगितली आहे. ते गुरुवारी (६ जुलै) टीव्ही ९ मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत बोलत होते.
उल्हास बापट म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करणाऱ्या अजित पवार गटाचा दावा आहे की, त्यांच्याकडे विधीमंडळात बहुमत आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं आहे की, खरा पक्ष वेगळा आणि विधीमंडळ पक्ष वेगळा. त्यामुळे खरा पक्ष शरद पवारांकडे आहे आणि विधीमंडळ पक्ष अर्थात अजित पवारांकडे आहे.”